खानदेश रेल्वे माथाडी मालधक्का कामगार
संघटनेचे अध्यक्ष श्री. मुकेश (आबा) रमेश
बाविस्कर, यांच्या वतीने ५०० रेल्वे माथाडी
कामगार यांची दिवाळी गोड करण्यात आली. या
प्रसंगी रेल्वे माथाडी कामगारांना प्रमुख
मान्यवरांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली.
त्यावेळी सर्व कामगार वर्ग, युनियन अध्यक्ष,
उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सदस्य उपस्थित
होते.
तसेच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा.
उपमहापौर, श्री. अश्विनभाऊ सोनवणे,
श्री.शरदभाऊ तायडे, श्री. राहुलभाऊ सोनवणे,
श्री. किशोरभाऊ बाविस्कर, श्री. विलासभाऊ
सोनवणे, श्री. बंटीभाऊ गवळी, श्री. विनोदभाऊ
कोळी, किरणभाऊ तडवी, मान्यवर उपस्थित होते.
माथाडी कामगारांची दिवाळी गोड व्हावी, या
उद्देशाने घेतला गेलेला कार्यक्रम हा अतिशय
हर्शोल्हासात पार पडला, या वेळी सर्वच प्रमुख
अतिथी यांनी संघटनेचे अध्यक्ष यांचे कौतुक करत
असताना सर्व कामगारांना दीपावली शुभेच्छा
दिल्या आणि संघटना अश्याच पद्धतीने कामगार
बंधुसाठी विविध उपक्रम राबवून कामगारांचे प्रश्न
मार्गी लावणार असा विश्वास व्यक्त करून,
संघटनेला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
दिल्यात.