साकळी ता.यावल । वार्ताहर-चोपडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पवार या महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रचार रॅलीचे साकळी येथे दि.१० रोजी आयोजन करण्यात आलेले होते.या रॅलीत गावातील सर्व मतदारांशी संवाद साधण्यात आला व त्यांच्या नागरी समस्या-अडीअडचणी समजून घेण्यात आल्या.साकळी ग्रामपंचायत कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली.उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे तसेच महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्व.मधुकर अप्पा महाजन यासह ठिकठिकाणी विविध प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.तसेच रॅली दरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांना ठिकठिकाणी महिला- भगिनींनी औक्षण केले.या रॅलीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर सोनवणे यांचे चिरंजीव साकळी गावाचे लोकनियुक्त सरपंच दीपक नागो पाटील,उपसरपंच फक्रुद्दीनखान कुरेशी, राष्ट्रवादीचे विभाग क्षेत्र प्रमुख अनिल साठे,युनूसशेठ मन्सुरी,वढोद्याचे सरपंच संदीप भैय्या सोनवणे,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख अन्वरभाई,माजी ग्रा.पं.सदस्य सै.अशपाक सै. शौकत,राजू सोनवणे, साहेबराव बडगुजर,शरद बिराडे ,सर्फराज तडवी,शिरसाडचे भैय्या पाटील,सचिन चौधरी,अजगर मेंबर,शे.सलिमभाई ,शिवसेनेचे कार्यकर्ते धनंजय माळी,सलीम इदू तडवी, ग्रामपंचायत सदस्य खतिब तडवी,शे.बिस्मिल्ला शे. रहेमान (बाबा मेंबर)मुकेश बोरसे,नरेंद्र मराठे,इक्बाल मसूरी,वसीम खान,सतिष न्हावी ,अरुण भोई,असलम पिंजारी,उमेश बडगुजर,ज्ञानेश्वर मराठे,ईश्वर बडगुजर,योगेश कुंभार,बबलू मन्यार,इरफान शाह,पंकज जैन,गोपी बडगुजर,जयेश मोते,सद्दाम पिंजारी,शेख तोफिक,समीर खाटीक, सैयदअल्ताफ सैयद अरमान यांचे सह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झालेले होते.या रॅलीमुळे गावात निवडणुकी दरम्यान प्रभाकर सोनवणे यांच्यासाठी चांगले वातावरण निर्माण झालेले आहे.आपल्या सर्वांच्या हक्काचा आमदार म्हणून आपल्याला सर्व मतदारांना महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर आप्पा सोनवणे यांना निवडून द्यायचे असून आपल्या चोपडा मतदारसंघाला एक जिव्हाळ्याचा व आपल्या सर्वांच्या भावना जाणून घेणारा आमदार यापुढील काळात द्यायचा आहे.अशी भावना सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

admin

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *