नाशिक जिल्हा प्रतिनिधी
शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी सघंटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. हारून शेख साहेब, राष्ट्रीय महासचिव मा. योगेश दंदणे साहेब, संचालक तथा राष्ट्रीय संघटक योगेश पाटील सर व संचालक मंडळ यांच्या सहकार्याने दि. 12/01/2025 मुख्य कार्यालय नाशिक रोड येथे राज माता जिजाऊ माॅसाहेब यांच्या जयंती निमित्त मान वंदना देण्यासाठी व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्या तर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हारून भाई शेख यांनी सर्व महिला पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आज राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती, जिजाऊनी जसे शिवबाना घडविले त्या जिजाऊंचा वारसा लाभलेला आपला महाराष्ट्र आहे, या मातीत स्वाभिमान भरलेला आहे, तोच मा साहेब जिजाऊंचा वारसा सर्व माता भगिनी यांनी पुढे चालविणे ही काळाची गरज झालेली असून, त्यांचे विचार जोपासून एक सुज्ञ समाज घडविण्यासाठी प्रयत्न करावा, सर्व माता भगिनी यांना मार्गदर्शन करण्या इतपत मोठे व्यक्तिमत्त्व नाही, माता भगिनी याच एक गुरू आहेत, परंतु एक संघ सुज्ञ समाज घडविण्यासाठी आम्ही संघटने मार्फत कार्यरत आहोत.
यावेळी नाशिक जिल्ह्या महिला अध्यक्षा. जान्हवी ताई फाजगे, जिल्हा प्रभारी शितल ताई पारासर, जिल्हा सचिव नसरीन ताई शेख, जिल्हा सहसचिव राखी ताई निखाळे, जिल्हा सल्लागार adv सुनिता ताई सिरमाने, जिल्हा सरचिटणीस हिना ताई शेख, नाशिक शहर अध्यक्ष adv उषाताई पगारे, नाशिक जिल्ह्या सदस्य मीना ताई सोनार, महिला पदाधिकारी व रजनी ताई जावरे, मनोज फाजगे सर्वाच्या उपस्थितीत पार पडला.