अहिल्या नगर, प्रतिनिधी.
सरकारी काम व सहा महिने थांब ही म्हण आहे पण शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठीचे दाखले, तसेच शैक्षणिक बाबीं करीता, स्पर्धा परिक्षा देणे करीता उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले तसेच आर्थिक दृष्ट्या मागास असले बाबतचे दाखले अशा विविध दाखल्यांची मागणी जनतेकडून होत असते. असे दाखले आपले सरकार सेवा केंद्र, सेतु कार्यालय यांच्या माध्यमातून तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांच्या स्वाक्षरीने ऑनलाईन पद्धतीने दिले जातात.
ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणाऱ्या दाखल्यांकरीता दर निश्चित करणेत आलेले आहेत. यामध्ये रु. 20/-+रु.10 महा ऑनलाईन स्टँप ड्यूटी GST असे एकूण रु. 33.60/- इतके आकारणे आवश्यक आहे. तसेच सदर दर पत्रकाचा फलक दर्शनी भागामध्ये लावणे आवश्यक आहे.
तथापि अशा प्रकारचे दाखले देत असताना आपले सरकार सेवा केंद्र तथा सेतु कार्यालयामधून मोठ्याप्रमाणावर नागरिकांकडून शुल्क आकारणी होत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असल्या बाबतची बातमी वर्तमानपत्रा मध्ये प्रसिध्द झाल्याचे निदर्शनास आले आहे. आपले अधिनस्त आपले सरकार सेवा केंद्रांची दरमहा तपासणी करुन तपासणीमध्ये दोष आढळल्यास, नमुद केले पेक्षा अधिक शुल्क आकारणी करीत असल्यास संबंधीत केंद्र चालक यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करणेबाबतची कारवाई करणेत यावी. तसेच शासन निर्णयानुसार अपेक्षित असणारी कार्यवाही सर्व आपले सरकार सेवा केंद्रामध्ये केली जाईल व सर्व नागरिकांना विहीत मुदतीत सर्व दाखले प्राप्त होतील, सदर सर्व प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शकपणे पार पाडली जाईल याबाबत योग्य ती प्रणाली सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात करावी व त्याची अंमलबजावणी करावी. याबाबत आपल्या अधिनस्त सर्व कार्यालय व आपले सरकार सेवा केंद्र यांना अवगत करण्यात यावे. शासन निर्णय क्रमांकः आसेकें-१०२२/सेतू/प्र.क्र.११/मावतं, व सेतु केंद्रचालकां साठीच्या सुचना द्यावे. सेतू केंद्र चालकांनी शासकीय सेवांचा दर फलक दर्शनीय भागावर ठेवण्यात यावा व त्यानुसारच दर आकारणी करावी. सदर फलकाचा आकार किमान ५ फूट x ३ फूट असावा. सेतू केंद्र चालकाने नागरिकांसाठी आसन व्यवस्था, पंखे, पिण्याचे पाणी, इत्यादी सोयी उपलब्ध करून द्याव्यात. सेतू केंद्र चालकांनी दि. १९/०१/२०१८ रोजीच्या शासन निर्णयातील मुद्या क्र.२.४ मध्ये नमुद केल्याप्रमाणे तसेच, परिशिष्ठ-ड प्रमाणे सेतू केंद्रे अधिसूचित / ब्रेडींग करावी.
सेतू केंद्र चालकांनी नागरिकांना सौजन्याची वागणूक द्यावी.
शुल्क निश्चित केलेली पावती देणे बंधनकारक करणेबाबत. शासनाने प्रत्येक दाखल्यासाठी ठरवून दिलेले दर केंद्रावर प्रसिध्द करणे. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालू ठेवून नागरिकांना सेवा पुरविणे आपले सरकार सेवा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या या सेवांबद्दल नागरिकांची काही तक्रार असल्यास, त्यांना टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर उपलब्ध करून द्यावा व दर्शनी भागात डिस्प्ले करा. याबाबत दिपक पाचपुते यांनी तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीची दखल घेवुन यांनी परीपञक काढुन नियमाप्रमाणे शुल्क आकारावे, असे आदेश दिले आहेत.