नवापूर प्रतिनिधी, शरीफ बागवान.
दिनांक 8 व 9 जानेवारी 2025 रोजी जि.प. शाळा भवानीपाडा केंद्र धानोरा येथे उद्बोधन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेमध्ये विद्यामा अध्यापनासाठी उपयुक्त ठरतील अशी बडबड गीते 101 कथा, गाणी, कृतीयुक्त गाणी नाट्य-करण पद्धतीने अध्यापन कसे करावे. साहीत्य, प्रतिकांचा वापर करून अध्ययन-अध्यापन कसे आनंददायी करता येईल मुलांना अभिव्यक्त होण्याची सूची निर्माण करून देणे, वाचन लेखन मौखिक भाषा, संख्याज्ञान, गणिती क्रिया एकुणच पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान याविषयी विविध कृती, उपक्रमांचे सादरीकरण सुलभकांच्या वतीने करण्यात आले.
उपस्थित, सर्व शिक्षक बंधू आणि मागणी यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले त्यामुळे कार्यशाळा आनंददायी आणि उत्साहवर्थक रितीने पार पडली.
कार्यशाळेला खानोटा बिटाचे विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. श्री. जयंत चौरे साहेब यांनी भेट देऊन गुणवत्ता वाढीसाठी सर्व शिक्षकांनी सतत प्रयत्नशील असावे असे मत व्यक्त केले. तसेच कार्यशाळेला धानोरा केंद्राचे केंद्र प्रमुख मा. श्री. बोरसे सर यांनी भेट शिक्षकांना मोलाचे मार्गदर्शन केले.
शासनामार्फत शाळेला मिळालेल्या साहित्य पेटीतील देवून मार्गदर्शन केली शासना मार्कल पेटीतील साहित्यांच्या वापर कसा करावा शाळेला यावर सुद्धा कार्यशाळेमध्ये चर्चा/संवाद साधण्यात आला, सुलभक म्हणून श्री. प्रकाश आर. गावीत सर, श्री. विलास डी. बिलवणे सर, सौ. निलीमा डी. माळी मॅडम, रागिणी एस. वाडेकर मॅडम यांनी जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळेला भवानीपाडा शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच केंद्रातील सर्व शिक्षक बेधू, भगिणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे काय शाळा यशस्वीपणे पार पडली.