संकलन:हुसेन रुबाब जमादार
प्रतिनिधी, मन्सूर तडवी.
*लोहारा* ता.रावेर जि.जळगाव यांचा दिनांक 15 जानेवारी 2025 बुधवार उर्स(यात्रा )आहे. गेल्या दोनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या उर्साला (यात्रेला) आदिवासी तडवी भिल समाजाची सामाजिक तसेच ऐतिहासीक सुफी संतांची पाश्चभुमी आहे.
गेल्या दोनशे वर्षांपासुन लोहारा येथे ह. गरिबशाहा बाबा रहमतुल्लाहे यांचा”उर्स” मोठ्या हर्षो_उल्हासात साजरा केला जातो.साधारणत: जानेवारी महीण्यात पौष पौर्णिमेनंतर उर्स भरवण्याची परंपरा आहे.हिंदु_मुस्लीम व आदिवासी समुदायाकडून या उर्साचे (यात्रेचे)आयोजन केले जाते. या उर्साला एका सणाचे एका मोठ्या उत्सवाचे स्वरुप प्राप्त होते.गावातील प्रत्येक आप_आपल्या घरांना डागडूगी करुन सजवितात, रंगरांगोटी केली जाते, घरातील सर्वांना नवीन कपडे घेतले जातात.!!
उर्साची सुरवात का? व कशासाठी?
गुली लोहारा हे अतिदुर्गम गाव,दळवळणाच्या साधनांचा वापर कमी प्रमाणात होता, गरीबी खुपच होती. कष्टाळु जिवन, यांसाठी त्यावेळी आपल्या पुर्वजांनी वर्षातुन एकदा तडवी समाज एकत्र यावा जेणेकरुन मुलगा किंवा मुलगी एकमेकांना पसंत व्हावी व लग्नयोग जुळुन यावा. नातेवाईकांच्या भेटी_गाठी व्हाव्यात. आपल्या उर्सा_निमित्त पिरांचा आशिर्वाद असावा किंवा पिरांविषयीची आस्था असावी यासाठी उर्स भरवण्याची परंपरा नंतरच्या काळात अधिकाधीक रुढ होत गेली.
१) संदल, २) उर्स, ३) बासी उर्स असा तीन दिवसांचा कार्यक्रम असतो. 1)संदलच्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात व पारंपारीक खेळ आखाडा व इतर अनेक मैदानी खेळ बघायला मिळतात. तसेच मोठ्या कब्रस्थानात ह.गरिबशाह बाबांच्या मजारीवर गलेफ चढवण्यात येतो. 2)उर्साच्या दिवशी मोठी यात्रा भरते. आदिवासी तडवी समाजाबरोबरच विविध जातीधर्नाचे लोक यात सहभागी होतात. लोहारा गावाच्या घराघरातुन ह.गरिबशाह बाबांच्या मजारीवर शिरणी, मलेदा, फुले तसेच गलेफ चढवण्यात येतो व रात्री मनोरंजनासाठी तमाशा व कव्वालीचा मनमुराद आनंद घेतला जातो. (तमाशा बर्याच वर्षांपासुन बंद आहे.) तमाशात गवळण, वग, लावणी व पोवाडा गायन होत होते. समाजातील घडलेल्या घटनांचा मागोवा तमाशात हुबेहुब पोवाडा रुपाने गायन केले जात होते. तसेच कव्वाली ही सुफी परंपरांना धरुन तसेच ख्वाजा गरीबे नवाज यांच्या जिवनावर आधारीत गायली जाते. मनकबत गजल, कलाम व सलाम हे कव्वालीचे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात. 3) बाशी उर्साला आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो. तसेच काही ठीकाणी मुले_मुली पाहण्याचा कार्यक्रम असतो. तर काही ठिकाणी सगाईची रस्म अदा केली जाते. (काळानुरुप बदल झालेला आहे.)
लोहारा उर्साची सामाजिक व ऐतिहासीक सुफी पाश्चभुमी
पुर्वीचे “गुली लोहारे” हे गाव वसल्यानंतर येथे आदिवासी तडवी भिल समाजाची संस्क्रुती नांदु लागली होती. सामाजिक रुढीवादी परंपरांना अनासायाने चालना मिळाली. कालांतराने सुफी फकीर व वली_अल्लाह पिर_व_मुर्शद यांच्या पदस्पर्शाने लोहारा हे गाव नंतरच्या काळात फकीरी जगताचे केंद्र बनले. येथे फकीर व वलीअल्लाह यांची कदर होऊ लागली. सुफी फकीरांचे सवाल पुर्ण होऊ लागले. फकीरांचे जत्थेच्या जत्थे येथे येऊ लागले. चावडीत फकीरांची वेगळी व्यवस्था केली जात होती.
जन्मतिथी निश्चीत सांगता येत नसली तरी याच काळात ह. गरीबशाह बाबा रहमतुल्लाहे यांचा जन्म लोहारा येथे इ.स. 1740 साली झाल्याचे सांगीतले जाते. ह.गरीबशाह बाबा रहमतुल्लाहे लहाणपणापासुनच इस्लामी तत्वज्ञानाने प्रेरीत झाले. त्यांना फकीरांपासुन इस्लामी तत्वप्रणाली शिकायला मिळाली. ते अमल_ए_वजूफा करु लागले. त्यांना सुफी फकीरांचा सहवास लाभला. ते गरीबखा चे ह.गरीबशाह बाबा व रहमतुल्लाहे नावाने सुपरिचित झाले. वयाच्या 67 व्या वर्षी इ.स.1807मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांना मोठ्या कब्रस्थानात दफन करण्यात आले. कालांतराने तेथे त्यांचा दरगाह बांधण्यात आला. व हजरत गरीबशाह बाबा रहमतुल्लाहे यांच्या नावाने लोहारा येथे मोठ्या हर्षो_ल्हासात उर्स भरविण्याची परंपरा रुढ झाली, ते आजतागायत सुरु आहे. सामाजिक ऐतिहासीक व सुफीवादी तसेच हिंदु_मुस्लीम एकतेचे प्रतिक म्हणुनही या उर्साला विशेष महत्व आहे.
ह. गरीबशाह बाबा रहमतुल्लाहे लोहारा यांचा उर्स म्हणजे आदिवासी तडवी भिल इतिहास,संस्क्रुती, समाज जिवन, सुफी परंपरा तसेच हिंदु_मुस्लीम एकता,राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे.