प्रतिनिधी मन्सूर तडवी

रावेर वडगाव येथील गेल्या अनेक दिवसापासून गटारी तुडुंब भरलेल्या असून ऐन पावसाळ्यात पाणीपुरवठा करणारे स्टॅन्ड पोस्ट जवळ बऱ्याच दिवसापासून घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे रमजान फकीरा तडवी आणि भिकारी कालू तडवी यांच्या घराजवळील स्टॅन्ड पोस्ट जवळ गटारीचे पाणी नेहमी एक ते दोन फूट साचलेले असते व साफसफाई नियमित न करता ती दीड ते दोन महिन्यातून केली जाते संबंधित ग्रामसेवक तसेच ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करीत असून गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते ऐन पावसाळ्यात साफ सफाई नसल्याने गावातील नागरिकांचे हाल होत आहे गावात रोगराई पसरण्यात जणू हे दृश्य आमंत्रणच देत आहेत असे नाकारता येत नाही तरी तालुक्यातील गट विकास अधिकारी तसेच प्रशासन यांनी लक्ष देऊन संबंधित गावकऱ्यांचे स्वच्छता व पाणीपुरवठा चें प्रश्न सोडवून मार्गी लागावेत अशी ग्रामस्थांची मागणी होत आहे आणि वडगाव गावातील ग्रामसेवक हे पंधरा पंधरा दिवस हजेरी लावत नाही तरी गावात नियमित कायम स्वरूपी ग्रामसेवक मिळावा अशी गावकऱ्यांकडून मागणी होत आहे

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!