साकळी ता.यावल । वार्ताहर राजू पिजारी –
येथील अक्सा नगर भागातील रहिवाशी गुलशनबी हाजी शेख अमीर (वय -९०) यांचे काल दि.७ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज दि.८ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या अक्सानगर येथील निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावाई, नातवंडे असा परिवार आहे त्या अंजुमन- ए-इस्लाम उर्दू शाळेचे उपशिक्षक फारूख सर यांच्या मातोश्री तर जामा मशीद साकळी ट्रस्टचे अध्यक्ष मो. जफर यांच्या मोठ्या आई होत.