*यावल शिक्षण विभागाचा अजब कारभार, साकळी येथील डीटीएड धारकांचे निवेदन

.

साकळी ता.यावल। वार्ताहर- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून यावल तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांच्या जागेवर डीटीएड प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना डावलून चक्की आयटीआय व बारावी पास झालेल्या उमेदवारांची यावल शिक्षण विभागाकडून नियुक्ती करण्यात आल्याने या निर्णयाच्या विरुद्ध साकळी ता.यावल येथील डीटीएडचे प्रशिक्षण घेतलेले रोहित बाविस्कर व ऐश्वर्या सोनार यांनी यावल येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी निवेदन दिलेले आहे. दरम्यान दि.१९ रोजी या निर्णयाच्या विरोधात तक्रार निवेदन देण्यासाठी संबंधित प्रशिक्षणार्थी तसेच त्यांचे पालक यावल शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेले असता गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सदरचे निवेदन न स्वीकारता कार्यालयातून निघून गेले यामुळे तक्रारदारांनी एकच संताप व्यक्त केला.
याबाबत सविस्तर असे की, यावल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १४० शाळांमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येक शाळांमध्ये डीटीएड/बीएड प्रत्येकी एक शिक्षकाची सहा महिन्यासाठी नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी दर महिन्याला सहा ते दहा हजार रुपयापर्यंत मानधन देण्यात येणार आहे. व या भरती संदर्भात सप्टेंबर महिन्याच्या दि.६ रोजी पासून कार्यक्रम देण्यात आलेला होता व यावल पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे संबंधित उमेदवारांना अर्ज दाखल करावयाचे होते. त्यानुसार साकळी ता.यावल येथील रोहित बाविस्कर व ऐश्वर्या सोनार या दोघं डीटीएड धारकांनी अर्ज दाखल केलेले होते. दरम्यान दि. १७ सप्टेंबर २०२४ रोजी यावल शिक्षण विभागाकडून प्रशिक्षणार्थींची अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली असता यात तक्रारदारांना डावलून चक्क बारावी पास झालेले तसेच आयटीआय धारक प्रशिक्षणार्थींना संबंधित योजनेअंतर्गत शिक्षकपदी नियुक्त केलेले आहे. त्यामुळे आपल्यावर अन्याय झालेल्या असल्याने दोघं तक्रारदारांनी आपल्या पालकांसह दि.१९ रोजी यावल पंचायत समितीचा शिक्षण विभागा गाठून गटशिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारला. आम्ही स्थानिक असल्यावर तसेच डिटीएड धारक प्रशिक्षणार्थी असल्यानंतर या योजने करता आम्ही पात्र असताना आम्हाला का डावलण्यात आले? असा मनमानी कारभार का करण्यात आला? आमचे एवढे शिक्षण घेऊन काय उपयोग? आपल्या विभागाकडून आयटीआय धारक व बारावीच्या उमेदवारांची प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्ती करून आमच्या शिक्षणाची थट्टा केली जाते आहे का? बारावी,आयटीआयचे प्रशिक्षणार्थी मुलांना काय शिकवणार? असे अनेक प्रश्न संबंधित तक्रारांनी व पालक श्रीमती वंदना कोळी यांनी गटशिक्षणाधिकारी धनके साहेब यांना विचारले. मात्र यावर साहेबांनी कुठलीही उत्तर व्यवस्थित न देता उडवा उडवीचे उत्तर देत व आपली जबाबदारी झटकून मोकळे झाले. आम्हाला जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेश दिल्याप्रमाणे आम्ही नियुक्त्या गेलेल्या आहे असे सांगून धनके साहेब मोकळे झाले. यावेळी पालकांनी खूप संताप व्यक्त केला. त्यानंतर तक्रारदार हे धनके साहेब यांना या निर्णयाविरोधात निवेदन देण्यात गेले असता त्यांनी आपले कार्यालय सोडून चक्क बाहेर निघून गेले व निवेदन स्वीकारले नाही. मग साहेबांचे असे करण्यामागचा हेतू काय असावा. हा मोठा संभ्रम तक्रारदारांमध्ये निर्माण झालेला दिसून आला. एकूणच असा हा शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या निर्णया विरुद्ध आम्हाला योग्य तो न्याय मिळावा असे तक्रादारांचे म्हणणे आहे.

गटशिक्षणाधिकारी यावल यांची प्रतिक्रिया-
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने करता प्रशिक्षणार्थ्यांची निवड करताना कोणताही पक्षपाती केलेला नाही. कुणावरही अन्याय केलेला नाही. साकळी गावात बारावी प्रशिक्षणार्थी घेतलेला नाही. तालुक्यात जेथे डीएड उपलब्ध नाही त्या ठिकाणी बारावी, आयटीआय प्रशिक्षणासाठी घेतले आहे. तक्रारदारांचे निवेदन मी टपाला टाकायला सांगितले होते त्यामुळे न स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही. टपालातून मी निवेदन लगेचच मागून घेतले. डिटीएड धारकांना टक्केवारी नुसार प्राधान्याने घेतलेले आहे.
धनके साहेब
गटशिक्षणाधिकारी यावल.

admin

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *