प्रतिनिधी, दिपक विशे.
दि. १४/०९/२०२४ रोजी सायंकाळी ८:५२ मिनिटांच्या कसारा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना अनोळखी बॅग असल्याचे लक्षात येताच ,बॅगांमध्ये मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम ₹३१५००/- असल्याचे मुसई येथील दक्ष नागरिक श्री रवींद्र कुडव याच्या निदर्शनास आले लागेच त्याने वासिंद रेल्वे स्टेशन मास्तर आणि आरपीएफ कर्मचारी यांचेकडे बॅगा सुपूर्द केल्या. यावेळी कोणताही लोभ मनात न बाळगता निस्वार्थी भावनेने ह्या बॅगा परत केल्याने नवी मुंबई रबाले येथील सुरज गुप्ता व महेश पवार यांना यांच्या मौल्यवान वस्तू व रोख रक्कम एकतीस हजार पाचशे सह बॅगा परत मिळाल्या. त्यांनी रवींद्र कुडव व स्टेशन मास्तर, आरपीएफ कर्मचारी यांस लेखी अभिप्राय देऊन कृतज्ञता व्यक्त करून आभार मानले .या कृतीने फक्त त्या प्रवाशांचाच नव्हे, तर समाजातील प्रत्येक नागरिकाचा माणुसकीवरील विश्वास वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला. रवींद्र प्रहार जनशक्ती पक्षाचा शहापूर तालुका सहसचिव आहे.
रविंद्र च्या या कर्तव्यदक्ष गुणाचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.