गटविकास अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी करत मनसे आक्रमक,
जळगांव प्रतिनिधी
dth=”300″ height=”225″ class=”alignnone size-medium wp-image-85″ />
रावेर तालुक्यातील केराळे ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी एस टि पाटील हे आहेत केराळे गावातील नागरिकांनी व ग्रामपंचायत सदस्यांनी तक्रारी करून सुद्धा त्यावर कोणतेही उपायोजना करताना ग्रामसेवक दिसत नाही व त्यांच्या त्रास सर्व ग्रामस्थांना सहन करावा लागत आहेत रावेर मध्ये ग्रामसेवक सरकारी कामापेक्षा खाजगी कामातच दंग असल्याने ग्रामस्थांना विविध कामांसाठी खोडबुन राहावे लागत असल्याबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे एस टि पाटील हा ग्रामसेवक असून त्याच्या अनेक वेळेला मनमानी कारभार समोर आलेला आहे तसेच महाराष्ट्र जिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम 1958 प्रमाणे पंचायतीचे सचिव म्हणून ग्रामसेवक हे कार्य पार पाडत असतात पण या किराडे गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्रामसेवक कोणतेही आपले कर्तव्य पार पाडताना दिसत नसून एस टि पाटील ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांनी शिस्तभंग केला आहे तरी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा नियम १९५४ च्या नियम चार नुसार ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी व त्यांना दुसऱ्या गावात रुजू तात्काळ बदली करण्यात यावी व केराळे ग्रामपंचायत मध्ये चांगले विकास कामांना व गावाचे निर्णय घेण्याच्या दृष्टीने ग्रामविकास अधिकारी यांना तात्काळ बदली म्हणून पाठवावे व एस टि पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अधळकर यांच्या नेतृत्वात, विद्यार्थी सेनेचे ता. सचिव विनीत महाजन, रितेश महाजन, राहुल महाजन, गोपाळ महाजन, नंदू महाजन, गणेश महाजन, महेंद्र महाजन, अमोल चौधरी, शुभम महाजन उपस्थित होते.
सदर गट विकास अधिकारी यांच्यावर तत्काळ कार्यवाही न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती रोजी जन आंदोलन किंवा आमरण उपोषण करू असा इशारा देण्यात आलेला आहे.
सदर पत्रकाची प्रत ही माहिती साठी मा. जिल्हाधिकारी सो जळगाव, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सो जि प जळगाव, मा. प्रांतअधिकारी फैजपूर, मा. तहसीलदार सो रावेर यांना सादर करण्यात आलेली आहे.